Saturday, October 9, 2010

असे का?

खरच प्रेमात नेहमी असच होत का?

तो समोर नसताना
नेहमी विचारांच वादळ येते माझ्या मनात,
तो दिसला की मात्र
उत्साहाची लहर संचारते माझ्या तनात.

प्रत्येक वेळी डोळे माझे
शोधत असतात फक्त त्याला,
विसरते मी माझी सर्व दु:खे
स्मरून त्याच्या स्मिताला.

नकळतपणे सर्व सुख- दु:खे माझी
जोडली गेली त्याच्या अस्तित्वाशी,
त्याला नाही कलली तरी
अवस्था माझ्या मनाची.

त्याला आनंदात पाहून मग
मीसुद्धा आनंदी रहू लागले,
स्वत:च दुःख विसरून फक्त
त्याच्या सुखासाठी जगू लागले.

खरच प्रेमात नेहमी असच का होते?

Thursday, October 7, 2010

स्पर्श तुझा....

स्पर्श तुझा....
ग्रीष्मातिल पाउस असा

स्पर्श तुझा....
तपता उन्हातील गारवा जसा

स्पर्श तुझा....
पानावरील दवबिंदू असा

स्पर्श तुझा....
मंद सुवासिक मरवा जसा

स्पर्श तुझा....
 जगण्यासाठी आधार असा

स्पर्श तुझा....
निराशेत आशेचा किरण जसा

Saturday, October 2, 2010

फक्त प्रेम!

प्रत्येकाच्या आयुष्यात कधी ना कधी आशा गोष्टी घडतात की त्यांचा आपल्याला तेव्हा अणि नंतर सुद्धा खुप त्रास होतो.त्या त्या वेळी आपल्याला योग्य वाटेल ते आपण करत जातो. पण ते योग्य होते की नाही हे पुढे येणारा कालच ठरवतो. त्या गोष्टींमुले आपण स्वतःवर तर रागावतो पण समोरच्या व्यक्तीवरसुद्धा रागावतो.कधी कधी ते नाराज असने इतके वाढते की त्या व्यक्तीच्या प्रत्येक वागण्याचा त्रास आपल्याला व्हायला लागतो.त्या वागण्याचा त्रास न होण्यासाठी आपण कधी कधी त्या व्यक्तिपासून दूर होण्याचा क्रूर निर्णय घेउन बसतो. त्या व्यक्तिबद्दल मनात अढी ठेवतो. पण असे करने कितपत योग्य आहे?

देवाने आपल्याला इतके सुरेख आयुष्य दिले आहे. एकमेकांवर प्रेम करण्याऐवजी फक्त राग, लोभ, द्वेष करत असतो. या मागे फक्त परिस्थिति असते असा नाही. या मागे एक महत्वाच कारन म्हणजे आपला खोटा अभिमान, अहंकार आणि स्वताहाची चुक असताना ती मान्य न करण्याची वृत्ति.या मुले ना आपण कधी सारासार विचार करतो ना विवेकबुद्धीने वागतो.

या सगल्यांवर आपल्याला ताबा ठेवता यायला हवा. तरच आपली विचार करण्याची दिशा योग्य आहे याची खात्री असेल. राग, लोभ, द्वेष यांना थारा उरणार नाही. प्रेमभावना जोपासली जाइल. आपण हे कायम लक्षात ठेवायला हवे की हे आयुष्य खुप छोटे आहे. त्यात आपल्याला प्रेम करायला, नाती जोडायला अणि ती टिकावायालाच कसा बसा वेळ मिलतो तर द्वेष, राग यांसाठी आपल्याला कधी वेळ मिळणार? म्हणून दोस्तहो आयुष्यात फक्त प्रेम करा. आयुष्य खुप सुन्दर होइल.