Saturday, September 11, 2010

बंध...

बंध मनांचे अपुल्या नकळत ऐसे जुलले
तुजसवे मी सखया कुसुमापरी फुलले

बहरला रुतु वसंत मनी तप्त ग्रीष्मात जणू
मोहरले त्यापरी मनात तव प्रीतीचे इंद्रधनू
वेद्य मनास माझ्या काही न मग सुचले
तुजसवे मी सखया कुसुमापरी फुलले

ओज़रत्या स्पर्शाने तुझिया शहारले माझे तन
सोबतीला तुझिया रे आसुसले वेडे मन
अबोल डोले मग हे तुजपाशी सर्व वदले
तुजसवे मी सखया कुसुमापरी फुलले

असता क्षणोक्षणी ममसवे तू सखया
मम जीवन हे बहरले प्रीतीने तुझिया
जीवनी मग या तुजवाचुन काही न उरले
तुजसवे मी सखया कुसुमापरी फुलले

2 comments:

  1. Concept shabda madhye neet pakadala ahes... Good..
    बहरला रुतु वसंत मनी तप्त ग्रीष्मात जणू
    मोहरले त्यापरी मनात तव प्रीतीचे इंद्रधनू.. :)

    ReplyDelete